नागपूर
01-02-2025 21:27:54
Mission Maharashtra
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय; दिनेश बंग, माजी जि प सदस्य
केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय; दिनेश बंग, माजी जि प सदस्य
नागपूर: ( दि. १ फेब्रु. २०२५ ) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प महाराष्ट्राची घोर निराशा करणार आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काही आलेलं नाही.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कमी जागा मिळाल्या याचाच राग केंद्र सरकारला असल्याची शंका होत आहे त्यामुळेच महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पात काहीही मिळाले नाही. साधा महाराष्ट्राच्या नावाचा उल्लेख नाही. त्याचप्रमाणे बेरोजगारी,महागाई आटोक्यात आणण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना बजेटमध्ये दिसून येत नाही.




























































































































































































































































































































































































































