जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोलाम पॉड विकासाकरिता भरीव निधी उपलब्ध करुन द्या
नागपूर : ( दि. २७ जाने. २०२५ ) कोलाम पॉड विकासाकरिता पालकमंत्री यांनी ३० जानेवारी रोजी कोलाम समाजाची प्रशासकीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला कोलाम समाजाच्या विवीध संघटनेच्या पदधिकाऱ्यांनी सहाभागी होण्याचे आवहान शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांनी केले.
झरी - दलीत आदिवासी भूमिहीन ओबीसी यांच्या कब्जात असलेल्या महसूल व वन जमिनी ज्या शेतीसाठी आहेत अश्या जमिनी राखीव वनात हस्तांतरीत करण्यात येवू नये तसेच आदिवासी कोलाम समाजाच्या विविध मागण्या साठी शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी २६ जानेवारी रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
कोलाम समाजाच्या विविध संघटनेच्या पदाधिकारी यांनी पाठपुरावा केला त्यामध्ये प्रामुख्याने शामादादा कोलाम ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे, शामादादा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश गाडेकर यांनी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांना घेवून पालकमंत्री संजय राठोड यांची भेट घेवुन इंदिरा बोंदरे यांच्या आत्मदहन आंदोलनाची दखल घेवून त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अखेर पालकमंत्री संजय राठोड यांनी ३० जानेवारी रोजी कोलाम समाजाची प्रशासकीय बैठक घेण्याचे निर्देश दिले. यामुळे इंदिरा बोंदरे यांनी आपला आत्मदहनाचा ईशारा मागे घेतला असून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कोलाम पॉड विकसित करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी करणार असल्याची माहिती संघटनेच्या विशेष प्रसिद्धी पत्रकातून कळविली असता आजही कोलाम पौडावर सुरक्षित चावडी नाहीं, जिल्हा नियोजन समिती कडे करोडो रुपये शिल्लक असताना कोलाम समाजाच्या लोकांना घरकूल योजनेपासून वंचित राहावे लागत आहे, कोलाम पोडावर पोहच रस्ते नाही, स्वतंत्र शौचालय नाही , अजूनही मूलभूत सुविधा पासुन वंचित राहावे लागत असल्यामुळे शामादादा कोलाम ब्रिगेड च्या प्रदेश अध्यक्षा तथा व बिगर सातबारा शेतकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कोलाम समाजाची पहिल्यांदा प्रशासकीय बैठक होत असल्यामुळे सर्व कोलाम समाजाच्या संघटना एकत्र येवून जिल्यातील कोलाम समजाच्याविविध समस्या घेवून उपस्थित राहण्याचे आव्हान केले असून शामादादा कोलाम ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष सुरेश कुमरे, प्रदेश अध्यक्षा सौ इंदिरा बोंदरे कोलाम समाजाचे युवा सामाजिक कार्यकर्ते अतुल आत्राम, तसेच पालकमंत्री संजय राठोड यांनी कोलाम समाजाच्या सर्व समस्या लेखिस्वरुपत घेवुन सफर करण्याची जबाबदारी शामादादा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष शैलेश गाडेकर यांच्यावर दिली असल्याची माहिती कोलाम समाजाचे युवा नेते लक्ष्मण अस्वले यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली असून पहिल्यांदा जिल्ह्यात सौ इंदिरा बोंदरे यांच्या आक्रमक आंदोलनामुळे प्रशासकीय बैठकीचे आयोजन होत असल्यामुळे जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे करीष्मा अस्वले यांनी सांगीतले.




























































































































































































































































































































































































































