भंडारा येथे भव्य - दिव्य राज्यस्तरीय वधु-वर परिचय मेळावा १ मार्च ला
भंडारा.( दि. २२ फेब्रु २०२६ ) बुद्धिस्ट मंगल परिणय ग्रुप, भंडारा तर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार १ मार्च रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपंर्यत भंडारा येथील शिवम रेस्टोरेन्ट, दुसरा माळा भंडारा बस स्टाप जवळ आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद सोमकुवर, उमाकांत सोमकुवर, नरेश गायकवाड, श्रीधर सोमकुवर, उपस्थित राहणार आहेत. इच्छुक उपवर वधुनी प्रमोद सोमकुवर यांच्या मोबाईल क्रमांक 9373617114 वर संपर्क करून आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवहान संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोमकुवर यांनी केले आहे. सहयोग कल्याणकारी बहुउद्देशिय संस्था, नागपुरद्वारा संचालित बुद्धिस्ट मंगल परिणयचे नरेश गायकवाड यांच्या सहकार्यातून वरिल परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहनहि संस्थेचे अध्यक्ष प्रमोद सोमकुवर यांनी केले आहे.




























































































































































































































































































































































































































