द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा ची नागपुरात मोठी घोषणा नागपूर मरिना प्रकल्पाचा ताबा २ वर्षे आधीच मिळणार!
नागपूर: ( दि.१६ सप्टेंबर २०२६ ) रिअल इस्टेट क्षेत्रात एक नवी आणि सकारात्मक घडामोड समोर आली आहे. द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या प्रसिद्ध डेव्हलपरने आपल्या नागपूर मरिना या प्रमुख भूखंड प्रकल्पाचा ताबा दिलेल्या वेळेपेक्षा २ वर्षे आधीच देण्याची घोषणा केली आहे. रेरा कडे या प्रकल्पाची ताबा मुदत डिसेंबर २०३० नोंदवण्यात आली होती; मात्र आता हा ताबा डिसेंबर २०२८ मध्येच ग्राहकांना सुपूर्द केला जाणार आहे.
पश्चिम आशियातील वादामुळे साहित्याचा विस्कळीत झालेला पुरवठा आणि कामगारांची टंचाई यांसारख्या अडचणींमुळे अनेक बिल्डर्स कामाला विलंब करत फॉर्स मेज्युअर कलमाचा आधार घेत आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत ने मात्र बांधकामाचा वेग वाढवून ग्राहकांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण ९१८ भूखंड असलेल्या या प्रकल्पात अंतर्गत रस्ते, विद्युत उपकेंद्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि भूगर्भातील पाणी साठवण व्यवस्था उपलब्ध असणार आहे. नागपूरसारख्या उष्ण शहरात ३ एकरांचा बीच, वेव्ह पूल, २८,००० स्क्वेअर फूटचे क्लबहाऊस आणि ४० हून अधिक अत्याधुनिक सुविधा विकसित केल्या जात आहेत. जानेवारी २०२६ मध्ये लाँच झालेला हा प्रकल्प अवघ्या ३ वर्षांत म्हणजेच डिसेंबर २०२८ पर्यंत ताबा देण्यासाठी तयार होत आहे.
द हाऊस ऑफ चे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले,
आमच्यासाठी ताबा देणे ही केवळ करारातील अट नसून ग्राहकांशी असलेली बांधिलकी आहे. मरिना प्रकल्पाची घोषणा झाली तेव्हा अनेकांनी या संकल्पनेवर संशय व्यक्त केला होता, पण आज प्रत्यक्ष कामातून आम्ही ते सिद्ध करून दाखवले आहे. स्थानिक प्रशासनाचे सहकार्य आणि संपूर्ण टीमच्या समर्पणामुळेच हे शक्य झाले आहे, असे अभिनंदन लोढा यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी इम्पिरियल गोवा आणि दापोली येथील आयल ऑफ ब्लिस या प्रकल्पांमध्येही कंपनीने वेळेआधीच ताबा देण्याची कामगिरी केली आहे. नागपूर मरिनाचा २ वर्षे आधी मिळणारा ताबा हा ग्राहकांसाठी मोठा विजय मानला जात आहे.



























































































































































































































































































































































































































































































































































