अनेक गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात आरोपी हिमांशु जंगले अटकेत
★ एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
नागपूर ( दि.३ ऑक्टों २०२६ ): शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारा आणि विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अनेक गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला फरार आरोपी हिमांशु प्रमोद जंगले, वय २३ वर्ष, रा. एकात्मता नगर, जयताळा, एमआयडीसी, याला एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाने शिताफीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २ ऑक्टोबर रोजी दुपारी १४:१० वाजताच्या सुमारास एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी हिमांशु जंगले हा प्लॅस्टो कंपनी परिसरात फिरत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ परिसरात शोधमोहीम राबवली. प्लॅस्टो कंपनीच्या विरुद्ध बाजूला हिंगणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर संशयित इसम दिसून आला.
पोलिसांनी त्याला थांबण्याचा आवाज दिला असता, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु पोलिसांनी त्याला घेराव घालून ताब्यात घेतले. पंचांसमक्ष त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव हिमांशु जंगले असल्याचे सांगितले.
आरोपीच्या गुन्हे अभिलेखाची तपासणी केली असता, त्याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यासह अंबाझरी आणि राणा प्रतापनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.), भारतीय हत्यार कायदा (भा.ह.का.) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत विविध गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस उप आयुक्त परि.क्र. १ सिंगा रेड्डी ऋषिकेश रेड्डी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त एमआयडीसी विभागयशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन काठोवाडे, पोलीस उपनिरीक्षक पंकज सयाम, पोलीस हवालदार अभिषेक हरदास, प्रमोद गिरी, प्रमोद सोनोने, प्रवीण फलके, विक्रांत देशमुख तसेच पोलीस अंमलदार अंकुश कनोजिया, किरण शेजवळ, किशोर इंगळे व रोमित राऊत यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.




























































































































































































































































































































































































































































































































































