दहा दिवशीय संस्कार शिबीराचा थाटात समारोप
स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून घेण्यात आले संस्कार शिबीर
पुणे: ( दि. १६ मे २०२४ ) स्वयंदीप सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ओळख महामानवाची या १० दिवशीय संस्कार शिबीराचा सांगता समारोप १४ मे रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे मोठ्या थाटात करण्यात आला.
या कार्यक्रमाला आंबेडकरी विचारधारेचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतदादा साळवे, डॉक्टर पंचशीला दुर्गे , अनिलकुमार बस्ते, स्वयंदीप सोशल फांउडेशनच्या संचालिका प्रतिभा वानखेडे, मिलिंद माचले उपस्थित होते.
यावेळी स्वयंदीप सोशल फांउडेशनच्या संचालिका प्रतिभा वानखेडे यांनी सांगितले की, सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांनी केवळ मोबाईल , टीव्ही सीरियल मध्ये गुंतून न राहता, त्यांनी एकत्र यावे, सामाजिक, बौद्धिक , वैचारिक दृष्ट्या त्यांचा विकास व्हावा , संघ भावना वाढवी या उद्देशाने उन्हाळी संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात १२५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक,भावनिक दृष्ट्या विकसित करण्यासाठी विविध खेळ तसेच दहा दिवस दहा महापुरुषांच्या महान कार्याची माहिती दिली. बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक उदाहरणे देत बाबासाहेबांच्या गुणांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी एकाग्र चित्ताने ज्ञान आत्मसात करणे आजच्या युगात गरजेचे आहे. असे प्रतिपादन बुद्ध, फुले , शाहू आंबेडकर विचारधारेचे प्रशिक्षक मा. मिलिंद माचले यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन फाल्गुनी सोनवणे, हिने केले. प्रास्ताविक साक्षी कांबळे तर सुनंदा गायकवाड यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरिता सोनवणे , नंदा उबाळे , सागर मिसाळ , संघप्रिया सोनकांबळे, रमा बनसोडे , सुनंदाताई निकाळजे, पूजा पोळ, राधा वाघमारे , गौतमी यांनी परिश्रम घेतले.




























































































































































































































































































































































































































