अजितदादांच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली: रमेशचंद्र बंग, माजी मंत्री
◆ हिंगणा येथे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण; कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती
हिंगणा ( दि. २९ जाने २०२६ ) राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे दूरदृष्टी असलेले आणि कामाचा प्रचंड धडाका असलेले नेतृत्व होते. भविष्यात राज्याचे नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता त्यांच्यामध्ये होती. सत्तेचा वापर हा केवळ स्वार्थासाठी नसून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले. अजितदादांनी पाहिलेले राज्याच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे आणि पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे भावपूर्ण उदगार माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी काढले.
हिंगणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या वतीने आयोजित अजितदादा पवार यांच्या शोक सभेत ते बोलत होते. पुढे बोलताना रमेशचंद्र बंग म्हणाले की, शरदचंद्र पवार साहेबांनी राज्याला प्रगतीकडे नेण्यासाठी शेती आणि औद्योगिकीकरण या क्षेत्राच्या विकासाचा जो पायंडा पाडला, तोच वारसा अजितदादांनी अत्यंत समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या सोबत राज्याच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली त्यानंतर त्यांनीच मला नागपूर जिल्ह्याचे अध्यक्षपद देऊन काम करण्याची संधी दिली. दादांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करताना बंग यांनी सांगितले की, दादा वेळेचे अत्यंत पक्के होते. वाडी गावाच्या पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने मार्गी लावला, त्यावरून त्यांच्या कामाच्या गतीची प्रचिती येते. भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊनही त्यांनी कधीही आपली राजकीय विचारधारा सोडली नाही. आजच्या लोकप्रतिनिधींनी सत्तेचा लोकहितासाठी कसा वापर करावा, याचे आदर्श अनुकरण दादांच्या रूपाने समोर आहे.
शोक सभेला प्रामुख्याने माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बबनराव आव्हाळे, नगरसेवक सुरेश काळबांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती हजारे, वानाडोंगरी नगरपरिषदेचे गटनेते अनुप डाखळे, वाडी नगरपरिषदेचे गटनेते श्याम मंडपे, श्यामबाबू गोमासे, रामभाऊ महाले, नगरसेविका भाग्यश्री साकोरे, धर्मेंद्र चव्हाण, प्रशांत सोमकुवर, लोकमान छपेरे, सुशील दीक्षित, महेश बंग, डॉ अभय महांकाळ,सरपंच अरुण देवतळे, प्रेमलाल चौधरी, सुनील बोंदाडे, मिलिंद काचोरे, युसूफ खा पठाण, योगीराज पराते, नलिनी शेरकुरे, सरपंच शोभा माहुरे, उपसरपंच दिनेश ढेंगरे, दीपाली कोहळ, स्वीटी इटणकर, किशोर उके, पुष्करसिंग राजपूत, चंद्रभान काकडे, दत्तात्रय अड्याळकर, दिलीप उमाटे, लीला भांगे, मयुरी देवाळकर, विलास वाघ, हनुमान दुधबळे, प्यारू पठाण, अमेश बोदीले, किशोर पाटील, विष्णू बाणाईत, काशिनाथ मापारी, डॉ. अभय महांकाळ, दिलीप दोरखंडे, गोकुल मणियार, विलास भागवत, प्रमोद बंग, पुरुषोत्तम शेरकुरे, उमेश पन्नासे, कवडू भोयर, कपिल काकडे, प्रेम सावरकर, उपसरपंच शिराज शेटे, जावेद महाजन, गायत्री लरोकर, शोभा राठोड, दीपमाला बेल्लोरे, इंदुबाई अलम, सुनीता नागपुरे, अजय जनबंधू, दिलीप कुंभारे, नंदू इटणकर, चंदन वर्मा, धर्मेंद्र ठाकरे, अविनाश देवगडे, प्रेमलाल भलावी, यूनुस शेटे व मंगला इटनकर, तनोटसिंग सिसोडिया, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































