वंचित बहुजन आघाडी विदर्भातील दोन बड्या नेत्यांचे झाले निलंबन!
नागपुर: ( ११ नोव्हेंबर २०२५ )
वंचित बहुजन आघाडीचे विदर्भातील २ बड्या नेत्यांना पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य महसचिव किसन चव्हाण यांनी आज जारी केलेल्या पत्रानुसार नागपुर जिल्ह्यातील वंचित चे पदाधिकारी तथा विदर्भ संयोजक असलेले प्रफुल्ल माणके व विवेक हाडके यांचेवर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला असुन या दोन नेत्यांना वंचित बहुजन आघाडीतून ६ वर्षासाठी निलंबन केले आहे असे म्हटले आहे.
पुर्व विदर्भातील नागपुर, भंडारा गोंदिया, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वंचित ची संघठनात्मक बांधणी व बैठका घेत पक्ष वाढीवर सातत्याने पुढाकार घेणार वंचित चे पुर्व विदर्भ संयोजक विवेक हाडके व प्रफुल माणके यांच्या वरच पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवल्याने राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रफुल्ल माणके यांनी तर गत विधानसभा निवडणुक कामठी मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे विरोधात लढविली होती. या निवडणुकीनंतर काही वंचित च्या पदाधिकारी यांनी वंचित चे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांचेकडे वंचित उमेदवारांची तक्रार केली होती.




























































































































































































































































































































































































































