शांतीनगर पोलिसांकडून बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव; १५ जूनपर्यंत दावे सादर करण्याचे आवाहन
नागपूर: ( दि. ९ जुन २०२६ ) शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली आणि बेवारस स्थितीत असलेली वाहने पोलीस ठाणे परिसरात जमा आहेत. या वाहनांवर आजतागायत कोणीही कायदेशीर मालकी हक्क किंवा दावा सांगण्यासाठी पुढे आलेले नाही. त्यामुळे नियमानुसार या बेवारस वाहनांचा जाहीर लिलाव करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
या जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये ज्या नागरिकांना किंवा भंगार व्यावसायिकांना भाग घ्यायचा आहे, त्यांनी आपले सिलबंद निविदा पत्र दिनांक १५ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपर्यंत पोलीस ठाणे शांतीनगर येथे स्वतः हजर राहून सादर करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी केले आहे.
★ मूळ मालकांसाठी अंतिम संधी
तसेच, या यादीतील वाहनांच्या मूळ मालकांना जर आपल्या वाहनावर दावा सादर करायचा असेल, तर त्यांनी दिनांक १५ जून २०२६ पूर्वी आवश्यक त्या कायदेशीर कागदपत्रांसह शांतीनगर पोलीस ठाण्यात संपर्क साधून आपला दावा सादर करावा. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही आणि वाहनांचा लिलाव केला जाईल. लिलावात काढण्यात आलेल्या एकूण १८ वाहनांचा समावेश असून, लिलावाची एकत्रित मूळ किंमत ₹ २९,६००/- ठरवण्यात आली आहे.


























































































































































































































































































































































































































































