विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस कामठी येथे २ दिवसीय धम्मचक्र महोत्सव
★ पंचशील शांतीमार्च, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत प्रदर्शनी चा समावेश.
★ ड्रॅगन पॅलेस व बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारकाला आकर्षक रोशनाईची सजावट,
कामठी/नागपुर (दि. २७ सप्टेंबर २०२५ )
६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त लाखोंच्या संख्येनी आंबेडकरी बौध्द अनुयायी नागपुर येथील दिक्षाभुमी ला तसेच कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला भेट देत असतात, त्या निमित्ताने येणा-या अनुयायांकरिता नागरी सुविध उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातुन शासन स्तरावर ११ सप्टेंबर रोजी पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल यांच्या अध्यक्षते खाली व १५ सप्टेंबर रोजी नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री व महाराष्ट्रातील महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन नागपुर, येथे दिक्षाभुमी, ड्रॅगन पॅलेस च्या पदाधिकारी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रशासनाकडून दिक्षाभुमी व ड्रॅगन पॅलेस ला भेट देणा-या अनुयायांकरिता नागरी सुविधा तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीकोनातुन आढावा घेण्यात आला.
विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस ला लाखोंच्या संख्येनी भेट देणा-या भाविकांकरिता नगर परिषद कामठीच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पोर्टेबल टॉयलेट, मोबाईल टॉयलेट, बाथरूम, विद्युत व्यवस्था व जनरेटर, सी. सी.टी.वी. आरोग्य केंद्र, दोन चाकी व चार चाकी वाहणांकरिता पाकींग तसेच बसेस पाकींग व्यवस्था इत्यादी बाबत नगर परिषद चे मुख्याधिकारी श्री. विनोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. तसेच एस.टी महामंडळातर्फे दिक्षाभुमी ड्रॅगन पॅलेस प्रवासाकरिता बसेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
या वर्षी पावसाळा अद्याप कायम असुन पावसाची शक्यता असल्यामुळे ३० सप्टेंबर ते ३ ऑक्टोंबर दरम्यान पाऊस आल्यास आसपासच्या शाळा, कॉलेजेस्, सभागृह इत्यादी ठिकाणी येणा-या अनुयायांकरिता पर्यायी व्यवस्था करण्याची सुचना स्थानीक प्रशासकीय अधिका-यांना देण्यात आली आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त ड्रॅगन पॅलेस येथे दिनांक १ व २ ऑक्टोंबर रोजी 'धम्मचक महोत्सव चे आयोजन
६९ व्या धम्मचक्र महोत्सव निमित्त कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस येथे बुधवार दिनांक ०१ व गुरवार दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी असे दोन दिवसीय धम्मचक्र महोत्सव चे आयोजन करण्यात आले आहे बुधवार दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता 'पंचशील शांती मार्च विश्वविख्यात ड्रैगन
पॅलेस ते ही बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संोधन केंद्रा पर्यंत काढण्यात येणार आहे ६१ व्या गवक प्रवतंत्र दिना निमित्त ८९ मीटरच्या पंचशील ध्वजासह कामरोवक, कम्मरोविका, उपासक, उपासिका, विद्यार्थी व मोठ्या संख्येली आंबेडकरी अनुयायी सहभागी होतील दुपारी १२:३० वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब अबिलकर महामानवाचा जिवन प्रवास मल्टीमिडीया छायादित्र प्रदर्शनी वे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री व नागपुर जिल्याचे पालकमंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभ हस्ते व केंद्रीय संचार ब्युरो भारत सरकार वे मैत्रीय प्रचार अधिकारी भी सौरभ स्वेकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
धम्मदक महोत्सव निमित्त १ ऑक्टोंबर रोजी ड्रैगन पॅलेस परिसरात असलेल्या ही बाबासाहेब अबिडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र येथे सायंकाळी ७ ते १० वाजे पर्यंत बुध्द व भिम मितांच्या प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये स्थानिक कलाकारांसोबतव मुंबई व आमपुर येथील कलाकारांद्वारे सादरीकरण करण्यात येणार आहे.
गुरुवार २ ऑक्टोबर रोजी ६९ व्या चरमवक प्रवर्तन दिना निमित्त विश्वविख्यात ड्रमन पॅलेस टेम्पल येथे सकाळी १० वाजता पुज्यनिय निवसंघाच्या प्रमुख उपस्थितीत 'विशेष बुच्द वंदना घेण्यात येईल. या प्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीने परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पास मानवंदना देण्यात येणार आहे दुपारी १२ वाजता विश्वविख्यात ट्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरामध्ये भारतीय संविधानावे जगातील सर्वात मोठ्या आकाराची प्रतिकृती निर्मिती संकल्पाते प्रसारण महाराष्ट्र राज्याते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व भारत सरकार वे सडक परीवहन व महामार्ग मंत्री, नितीनजी मडकरी आणि भारत सरकारचे सामाजिक न्याय विभाभावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या स्वासदार निधीतुन प्राप्त झालेल्या झिन एसी, बस से लोर्कापण साहेळा सुध्दा संपन्न होणार आहे.
दोन दिवसीय धम्मचक महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी विश्वविख्यात ड्रैगन पॅलेसच्या प्रमुख, ओमाया सोसायटीच्या अध्यक्षा माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे राहतील.
धम्मचक महोत्सव निमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्राला आकर्षक रोशनाई ने सजावट करण्यात आलेली आहे.
ड्रॅगन पॅलेस परिसरात लवकरच ३०० लोकांची स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था करणार
धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त लाखोंच्या संख्येनी आंबेडकरी अनुयायी दिशाणुगी सोबतव कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल ला भेट देत असतात, काही राज्यातील भाविक वर्ष भर दिशाणुगी व ट्रॅगन पॅलेस ला भेट देत असतात, परंतु त्यांना निवासी व्यवस्था उपलब्ध नाही त्यामुळे त्यांची गैरसोय होते, करिता हूँमल पॅलेस परिसरात ३०० लोकांची सुसज्ज अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था वर्ष भरात उपलब्ध केली जाईल अशी माहिती अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी पत्रकांराना दिली




























































































































































































































































































































































































































