डॉ. आंबेडकर मिशन येथे जागतिक वंशवाद विरोधी परिषद उत्साहात
★ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना उत्तर विभागाच्या वतीने आयोजन
नागपूर / विशेष प्रतिनिधी:
आंबेडकर सेंटर फॉर जस्टिस अँड पीस अंतर्गत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना उत्तर विभागाच्या वतीने लश्करीबाग, आवळे बाबू चौक स्थित डॉक्टर आंबेडकर मिशन येथे जागतिक वंशवाद विरोधी परिषद मोठ्या उत्साहात आणि गांभीर्याने आयोजित करण्यात आली होती.
या परिषदेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भोला सरोवर हे होते. तर प्रमुख वक्त्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या रेशमा भोयर, उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे कार्याध्यक्ष देवेंद्र घरडे, प्राध्यापक नंदाताई भगत यांची उपस्थिती लाभली होती.
या प्रसंगी रेशमा भोयर बोलतानी मानवी हक्क, सामाजिक समानता आणिभारतामध्ये जन्म व जातीच्या आधारावर अन्याय, अत्याचार, अपमान, सन्मानाला ठेच पोहोचवणे, रक्तपात, बलात्कार, घरे जाळणे, मारहाण, विहिरींवरून पाणी घेण्यास बंदी, मंदिरात जाण्यास बंदी, शेतात काम न देणे, कमी मजुरी देणे, मजुरी वाढवण्याची मागणी केल्यास मारहाण करणे किंवा जीवाने मारणे, योग्य मोबदला न देणे, बालमजुरी करून घेणे, वाघ्या-मुरळी, पोतराज, जोगिणी इत्यादी हिंदू धर्मावर आधारित प्रथांच्या माध्यमातून धर्माच्या आधारावर वेश्याव्यवसाय, शारीरिक शोषण आणि गुलामीला खतपाणी घालणे, डोक्यावरून मानवी मैला व मल-मूत्र वाहून नेण्यास भाग पाडणे यांसारख्या अनेक मानवाधिकार उल्लंघनांमुळे देशभरातील जनतेच्या घटनात्मक मूलभूत हक्कांची दररोज पायमल्ली केली जात आहे. या वंशवादा विरोधात एकजूट होऊन लढा देण्याच्या गरजेवर भर दिला. कार्यक्रमाला शुशिला खांडेकर, कुंदा सहारे, छाया बेहरे, अरूणा पाटील, नंदा बागडे, अनिता रंगारी, सुनंदा कोचे, रेखा लोखंडे, नरेश महाजन, दिलीप वानखेडे, प्रभाकर पानतावणे, धनराज ढोके, रितेश बंन्सोड, अरविंद तायडे, विजय सुरवडे, चुन्नीलाल जाभूळकर यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

































































































































































































































































































































































































































































































