स्व. देवकीबाई बंग विद्याल्याची माजी विध्यार्थिनी उत्कर्षां जामोदकर एम. एस.ई.टी. मध्ये सहायक अभियंता
हिंगणा ( दि. १७ एप्रिल २०२५ ) स्व. देवकीबाई बंग विद्यालयाची माजी विध्यार्थिनी रायपूर येथील उत्कर्षां प्रमोद जामोदकर हिची महाराष्ट्र राज्य विज पारेशान कंपनीत सहायक अभियंता पदी निवड झाली.
वडील प्रमोद जामोदकर जि प शाळेत शिक्षक तर आई सुचित्रा जामोदकर गृहिणी यांची मोठी मुलगी उत्कर्षां जामोदकर हिचे नर्सरी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण हिंगणा येथील संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित स्व. देवकीबाई बंग इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज येथे झाले असून तिने पुढे अभियांत्रिकेचे शिक्षण पूर्ण केले व महाराष्ट्र राज्य विज पारेषण कंपनी द्वारा घेण्यात आलेल्या सहायक अभियंता पदाच्या परीक्षेत यश संपादन करून आपल्याला शाळेचे व रायपूर गावाचे नावलौकिक केले.
आपल्याला यशस्वी विध्यार्थिनीचा अभिमान बाळगत संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेतर्फे संस्थेच्या उपाध्यक्षा अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व भविष्यातील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्याल्याचे प्राचार्य नितीन तुपेकर, पर्यवेक्षक अतुल कटरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































