श्री गणेश टेकडी मंदिरात ५११ किलो लाडूचे वितरण
नागपूर: (दि. ८ सप्टेंबर २०२५ ) गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर विदर्भ महिला क्लब व आदर्श बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश टेकडी मंदिर प्रांगणात ५११ किलो लाडू वितरण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात करण्यात आले.
संस्थेच्या संचालीका ज्योति द्विवेदी यांनी श्री गणरायाची विशेष पूजन, आरती करून ५११ प्रसादरूपाने लाडूंचे वितरण करण्यात आले.
मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्री गणेश टेकडी मंदिर ट्रस्टतर्फे या आयोजनाबद्दल दोन्ही संस्थांचे आभार मानित अशा धार्मिक कार्यक्रमांमुळे समाजात सहयोग, समर्पण व बंधुत्वाची भावना दृढ होते अशी भावना श्री गणेश टेकडी मंदिर ट्रस्टने केली.
या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी, सुधाकर कोहळे, संस्थेच्या संस्थापक सचिव आदर्श बहुउद्देशीय शिक्षण संस्था, नागपूर ज्योती द्विवेदी ,राहुलप्रसाद शर्मा, सुनीता शर्मा, अरुणा मूर्ती. अतुल हरडे, सरिता मोहणे, पूजा मोरयानी, राजवीर सिंह, आदर्श द्विवेदी, कौशिकी द्विवेदी उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































