स्व. देवकीबाई बंग विद्यालयात विद्यार्थ्यांनी कृतीतून साजरा केला लोकशाहीचा उत्सव
विद्यालयातील विद्यार्थी परिषदेची निवडणुक व शपथ ग्रहण उत्साहात पार पडले
हिंगणा ( दि. १२ ऑक्टोंबर २०२५ ) स्थानिक स्व देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे नुकत्याच 2025 या शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थी परिषदेची निवडणुक लोकशाहीचा जागर करत उत्साहात पार पार पडल्या पार पडलेल्या. निवडणुकीत विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग घेतला.
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. विद्यार्थ्यांनी प्रचारापासून मतदानापर्यंत जबाबदारीची जाणीव ठेवून सहभाग नोंदवला. विद्यालयाचे प्राचार्य यांनी निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची भूमिका निभविल्याने विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणुकीत अपेक्षित असलेली पारदर्शकता आणि प्रामाणिकपनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळाले . अगदी मतपेट्या व्यवस्थित सीलबंद करणे. शिक्षकांच्या उपस्थितीत मतमोजणी करून निवडणुकीचा निकाल जाहीर करेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतीय लोकशाहीतील निवडणुकांचे महत्व विद्यार्थ्यांनी जाणून घेतले.
निवडून आलेल्या विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी विद्यालयातील प्रत्येक उपक्रमात सहभागी होऊन प्रामाणिकपणा, संघभावना व निष्ठेने कार्य करण्याची शपथ घेतली. त्यात विद्यालयाचे कॅप्टन म्हणून दामिनी काकडे व धवल सोनटक्के, उप कॅप्टन म्हणून सोयम देशमुख व आरुषी राखुंडे, क्रीडा कॅप्टन म्हणून चैतन्य कुकडकर व यामिनी आदमाने, शाळा परिषद प्रमुख सिद्धी तिवसकर व सांस्कृतिक विभाग कॅप्टन म्हणून सेजल कुकडे यांचा समावेश आहे.
विद्यालयात अशा निवडणुकांमधून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, जबाबदारीची भावना आणि लोकशाही मूल्यांची जपणूक होते, हीच खरी शिक्षणाची दिशा आहे. विचार व्यक्त करत संस्थेच्या उपाध्यक्षा अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग, प्राचार्य नितीन तुपेकर यांनी सर्व विजयी उमेदवारांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शाळेतील व शालेय जीवनानंतरच्या लोकशाही संवर्धनाकरिता शुभेच्छा दिल्या. तर या संपूर्ण विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकिची जबाबदारी ईशानी मित्रा,अतुल कटरे,दीपक कान्हेरकर,लक्ष्मी शेंबेकर,सोनम लारोकर,सुषमा भलावी, ऋतुजा भोंडगे आदी शिक्षकांनी परिश्रमाने पार पडली.




























































































































































































































































































































































































































