मानसिक त्रास देणाऱ्या दाम्पत्यावर दोन कोटींचा दावा !
★ वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर मनिष पाटील यांनी पाठविले वकिला मार्फत नोटिस
नागपूर ( दि. १३ ऑगस्ट २०२५ ) अमरावती येथे राहणाऱ्या दाम्पत्यावर वर्ल्ड रिकॉर्डच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मनिष पाटील यांनी त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या दाम्पत्यावर दोन कोटींचा इज्जत दावा ठोकला आहे. तसे वकिला मार्फत नोटिस पाठविले आहे. पाटील यांचा मानसिक छळ करणाऱ्या दाम्पत्यांचे नाव स्वामिनी तायडे व दिनकर तायडे आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेत मनिष पाटील यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला उच्च न्यायालयाचे वकिल भगवान लोणारे उपस्थित होते.
पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०२४ येथे मनिष पाटील यांनी नागपुरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनव्हेंशन सेंटर येथे 'टॅलेन्ट हंट' वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया चे आयोजन केले होते. या कार्यक्रमा मध्ये अमरावती येथे राहणाऱ्या स्वामिनी तायडे व दिनकर तायडे या दाम्पत्यांनी भाग घेतला होता. आयोजक मनिष पाटील यांना तायडे दाम्पत्यांनी अश्याच प्रकारचा वर्ल्ड रिकॉर्ड इंडियाचा कार्यक्रम अमरावती येथे घेण्याची विनंती केली होती. पाटील यांनी तायडे दाम्पत्यांच्या शब्दाला मानदेत ४०१ तासाचा 'हुनर की तलाश' नावाने वर्ल्ड रिकॉर्ड इंडियाचा कार्यक्रम अमरावती येथे आयोजित केला. सतत १८ दिवस कार्यक्रम चालला होता. आणि सुरळित पणे मनिष पाटील यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया चे CEO पवन सोलंकी हजर होते. सोलंकी यांनी वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया 'सक्सेस' झाल्याची घोषणा करत, कार्यक्रम स्थळीच तायडे दाम्पत्यांना वर्ल्ड रिकॉर्ड इंडियाचे प्रमाणपत्र व मेडल दिले. विशेष सांगायचे म्हणजे, वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया चे CEO पवन सोलंकी यांनी तायडे दाम्पत्यांचे अंदाजे चार महिण्यानंतर अहमदाबाद येथे एका पारितोषिक वितरण सोहळ्यात त्यांचा सुद्धा सत्कार केला. या सोहळ्याला मनिष पाटील उपस्थित होते.
एप्रिल २०२५ मध्ये मनिष पाटील यांनी नागपुर येथे सिनियर सिटिजन चा गाण्यांचा वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया चे आयोजन केले होते. अमरावती चे प्रभुदास फंडे यांनी कार्यक्रमात भाग घेतला होता. प्रभुदास फंडे यांनी मनिष पाटील यांना वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया चा कार्यक्रम अमरावती येथे घेण्याची विनंती केली. प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या ९६ व्या जयंतीचे औचित्य साधून अमरावती येथे प्रभुदास फंडे व पवन फंडे यांनी किशोर कुमार यांच्या गितांचा वर्ल्ड रिकॉर्ड इंडिया किशोर दा साँग चे आयोजन केले होते. स्वामीनी तायडे व दिनकर तायडे यांनी उपरोक्त कार्यक्रम प्रभुदास फंडे व पवन फंडे यांना न देता आम्हाला द्या अशी विनंती मनिष पाटील यांना केली होती. पाटील म्हणाले, मी प्रभुदास फंडे व पवन फंडे यांना वनच दिले आहे, हा कार्यक्रम फंडे परिवारच करणार. स्वामीनी तायडे व दिनकर तायडे यांच्या हातातून हा कार्यक्रम निसटल्यामुळे त्यांनी उपरोक्त कार्यक्रम फेल करण्याच्या प्रयत्न केला. मनिष पाटील यांच्या वर खोटे आरोप लावण्याचा प्रयत्न समाजमाध्यमातून केला. या दरम्यान मनिष पाटील यांना मानसिक त्रास झाला. एवढेच नव्हेतर, पाटील यांची प्रकृती सुध्दा खालावली होती. कुठलाच ठोस पुरावा नसताना समाजमाध्यमातून तायडे दाम्पत्यांनी मनिष पाटील यांचा मानसिक छळ केला. पाटील यांनी तायडे दाम्पत्यांच्या कृत्याला कंटाळून त्यांना वकिला मार्फत दोन कोटींचा इज्जत दावा ठोकला आहे. तसे नोटिस तायडे दाम्पत्याला पाठविले, असल्याची माहिती मनिष पाटील यांनी पत्रकारांना दिली. सायबर पोलिसात मनिष पाटील तक्रार करणार असल्याचेही मनिष पाटील यांनी सांगितले.




























































































































































































































































































































































































































