वंचित बहुजन आघाडी दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकारिणीची बैठक
काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, बी आर एस पी वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश
नागपूर:( दि. ३ सप्टेंबर २०२५) वंचित बहुजन आघाडी दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकारिणीची बैठक शहर अध्यक्ष मंगेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली व महासचिव राहुल दहीकर, धम्मदीप लोखंडे नागपूर शहर कार्यकारी अध्यक्ष सिद्धांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितित दक्षिण पश्चिम येथे घेण्यात आली. या बैठकीत काँग्रेस, बहुजन समाज पार्टी व बी आर एस पी च्या शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.
या बैठकीला सेवानिवृत्त निरी वैज्ञानिक रामटेके सर, वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर समितीचे विशेष सल्लागार डॉ. राजेंद्र डोंगरे, अमरावती विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रा. नाईक सर, दक्षिण पश्चिमचे महिला आघाडीचे कांचन देवगडे, मंदा गवळी, भारती धोटे ,जयश्री बोरकर उपस्थित होते.
एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दक्षिण, पश्चिम, मध्य, दक्षिण पश्चिम, आणि उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यांचा शहर अध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी पक्षाचा दुप्पट्टा घालून सत्कार केला. यावेळी दक्षिण पश्चिम विधानसभा कार्यकारणी पदासाठी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या .मुलाखत घेताना दक्षिण पश्चिम विधानसभेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल चर्चा करण्यात आली.




























































































































































































































































































































































































































