बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिना निमित्ताने इंदोऱ्यात विविध धार्मिक कार्यक्रम २० व २१ ला
नागपूर ( दि. १८ जाने. २०२५ ) संत सुफी हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या १५९ व्या जन्मदिना निमित्ताने इंदोरा १० नंबर पुल येथील लता देशमुख यांच्या निवास स्थान इंदोरा आनंद रोड, येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले आहे.
सर्वधर्म समभावाचे प्रतिक असलेले संत बाबा ताजुद्दीन अवलिया यांचा जन्मदिन २० व २१ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, सोमवार २० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ध्वजारोहण करण्यात येईल. रात्री ८ वाजता हाजी खलील शैदा यांचा "शमा - ए - महफिल" कव्वालीचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता इंदोरा आनंद रोड येथून भव्य शाही संदल काढण्यात येईल. संदल इंदोरा चौक, कमाल चौक, गोळीबार चौक, अग्रसेन चौक, महाल चौक, या प्रमुख मार्गाने निघून मोठा ताजबाग येथे पोहचेल. येथील बाबा ताजुद्दीन यांच्या मजारवर लताबाई देशमुख यांच्याहस्ते चादर चढविण्यात येईल. सायंकाळी ७ वाजता इंदोरा आनंद रोड येथे केक कापून बाबांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करून भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाला इंदोरा वॉर्ड कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिनेश घरडे, समाजसेवक मिलींद गोंडाणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लताबाई देशमुख यांनी एका प्रशिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.




























































































































































































































































































































































































































