गुढरी येथे वन महोत्सव, एक पेड़ माँ के नाम
गुढरी येथे वन महोत्सव, एक पेड़ माँ के नाम
★ 2.0" उपक्रमांतर्गत 20 हेक्टर क्षेत्रावर 22,000 वृक्षांची लागवड
भंडारा : (दि. १२ जुलैं २०२५ ) वनपरिक्षेत्र नवेगाव बांध, सहवनक्षेत्र बाराभाटी आणि नियतक्षेत्र चान्ना बाक्टी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा गुढरी येथे "वन महोत्सव : एक पेड़ माँ के नाम 2.0" उपक्रमांतर्गत 20 हेक्टर क्षेत्रावर 22,000 वृक्षांची लागवड यशस्वीपणे पार पडली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत पिंपळ, वड, आंबा, साग, जांभूळ, चिंच यासह विविध देशी विदेशी प्रजातींची झाडे लावली.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, जिल्हा परिषद सदस्या रचनाताई गहाने, पंचायत समिती सदस्या पुष्पलताताई दृगकर, संचालक कृ.उ.बा.स. संचालक लोकपाल गहाने, उपवनसंरक्षक अधिकारी वनविभाग गोंदिया पवनकुमार जॉग, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगावबांध अविनाशजी मेश्राम, पं.स.अर्जुनी मोर गटविकास अधिकारी पल्लवीताई वाडेकर, पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, वनपरिक्षेत्र अधिकारी नवेगावबांध सदाशिव अवगाण, ग्रा.पं. गुढरी सरपंच विवेकजी डोंगरे, संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमलपूर लिलेश्वरजी खुणे, कृ.उ.बा.स.संचालक दादाजी संग्रामे, कृ.उ.बा.स. संचालक व्यंकटजी खोब्रागडे, योगेश नाकाडे, सुरेंद्रजी ठवरे, भागवत लंजे, देवेन्द्र दृगकर आदी मान्यवर उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































