नागपूर
29-06-2023 15:09:10
Mission Maharashtra
परिवारासह जबलपुरला जाणे पडले महागात
नागपूर: (दि. २९ जून २०२३) येथील यशोधरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्लाट नंबर १०९१, योगी अरविंद नगर, पाडे वस्ती येथील सुशिला विनोद बाथो (वय ५७) हया घराला कुलूप लावून परिवारासह जबलपुरला गेले असता
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी आलमारीमधून सोने- चांदीचे दागीने व नगदी ९५ हजार रूपये असा एकूण २ लाख ७६ हजार ६०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी यशोधरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूद्ध कलम ४५४, ४५७ व ३८० अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास यशोधरा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वाकळे करीत आहे.


























































































































































































































































































































































































































































