*वाघाच्या कातडीसह दोन आरोपीना अटक*
★ *नागपूर व भंडारा वनविभागाची संयुक्त कार्यवाही,
नागपूर : ( दि. २१ जून २०२३ ) पवनी वनपरिक्षेत्र, व भंडारा वन विभाग भंडारा येथे गुप्त माहितीच्या आधारे वाघाच्या कातडीसह दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
विस्तृत माहिती अशी की, पवनी वनपरिक्षेत्र, व भंडारा वन विभागाला गेल्या काही दिवसापासून पवनी येथे वाघाच्या कातडी ची तस्करी होणार असल्याची गुप्त महिती मिळाली. त्यावर आधारावर वन विभाग नजर ठेवून होतें. आज सकाळी २१ जून रोजी पवनी वनपरिक्षेत्र, व भंडारा वन विभाग भंडारा येथे सापडा रचून तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली.
निलेश सुधाकर गुजराथी वय ३३ , विकास बाथोली बाथो वय ३१ दोन्ही राहणार चंद्रपूर असे अटक करण्यात आलेत्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून एक दुचाकी वाहन एम. एच. ३४ सीबी २७१७ व वाघाची कातडी जप्त करण्यात आली. आरोपी विरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलामा द्वारे वनगुन्हा नोदविण्यात येणारं आहे. सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक (प्रा) नागपूर रमेश कुमार भावसे, भारत सिंह हाडां, भा व से, उपवसंरक्षक नागपूर, राहुल गवई, भावसे, उपवनसंरक्षक, भंडारा यांचे मार्गदर्शनात पी. जी. कोडापे, विभागीय वन अधिकारि (दक्षता), हिरालाल बारसगडे, वन परिक्षेत्र अधिकारी (प्रा) पवनी, प्रमोद वाडे (प्रा ) वन परिक्षेत्र अधिकारी बुटीबोरी, निलेश तवले, दिनेश पडवळ, आर एस पोरेते, थुले, वासनिक सर्व वनरक्षक आणि भंडारा वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यानी कार्यवाही केली. पुढील तपास वाय. व्ही. नगुलवर स व स भंडारा हे करीत आहेत.




























































































































































































































































































































































































































