नागपूर
02-04-2026 19:32:37
Mission Maharashtra
नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम ५ एप्रिल रोजी
★ नितीन गडकरी स्वत: नागरिकांची निवेदने स्वीकारतील.
नागपूर: ( दि. २ एप्रिल २०२६ ) केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम रविवार, ५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजे पंर्यत खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला मंत्री महोदय यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
या वेळेत नितीन गडकरी स्वत: नागरिकांची निवेदने स्वीकारतील व ते नागरिकांना व्यक्तिशः भेटतील आणि त्यांच्याशी संवाद साधतील. नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी, मागण्या लेखी स्वरुपातच (आवश्यक कागदपत्रे जोडून) आणाव्यात. तसेच आपली लेखी निवेदने मंत्री महोदयांना द्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी १ ते २ या कालावधीत नितीन गडकरी आपल्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटतील.



































































































































































































































































































































































































































