विविध क्रीडा प्रकारातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास ; रमेशचंद्र बंग माजी मंत्री
★ स्व. देवकीबाई बंग विद्यालयात वार्षिक क्रीडा दिवस उत्सहात साजरा
हिंगणा ( दि. २५ जाने. २०२५ ) माणसाचे शरीर सुदृढ असले तर मन उत्तम राहतो आणि बुद्धी तल्लख होते. आपलं निरोगी आणि उत्तम शरीर हीच आपली खरी संपत्ती असते त्यामुळे आपलं शरीर उत्तम आणि निरोगी ठेवण्याकरिता विविध प्रकारचे खेळ आपल्याला अवगत असणं गरजेचे आहे त्यासाठीच विद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शरीर सुदृढ राहावे म्हणून संस्था नित्याने बौद्धिक कार्यक्रमाबरोबरच विविध क्रीडा स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न करतो असे राज्याचे माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग स्व. देवकीबाई बंग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित वार्षिक क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर हिंगणा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रभान शोभणे, संस्थेच्या उपाध्यक्ष अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर आप्तूरकर नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत मोहिते, स्व.देवकीबाई बंग विद्यालयाचे पर्यवेक्षक अतुल कटरे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी, पीटी विथ डान्स, क्लॅप डान्स, डंबल डान्स, अरेबिक, झुंबा, लेझीम, योगा, व मानवी मनोरे( पिरॅमिड ) आदी क्रीडा प्रकार सादर करून उपस्थित यांना अचंबित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीषा कटरे यांनी सूत्रसंचालन सोनम लारोकर व सिमा पारसे यांनी तर आभार सचिन भांडारकर यांनी मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरभरून प्रतिसाद दिला यशस्वीते करिता विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




























































































































































































































































































































































































































