दोन दिवशीय एचआर कॉन्क्लेव्ह व टीपीओ मीट २०२५ चे आयोजन ५ पासून
★ तुलसीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे आयोजन
नागपूर ( दि. ४ डिसेंबर २०२५ ) तुलसीरामजी गायकवाड-पाटील अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, येथील, जे.आर.डी. टाटा हॉल, टीजीपीसीईटी कॅम्पस येथे शैक्षणिक औद्योगिक फ्लॅगशिप कार्यक्रम एचआर कॉन्क्लेव्ह २०२५ आणि टीपीओ मीट २०२५ चे आयोजन शुक्रवार ५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राहुल बजैत, सीईओ व सह-संस्थापक, प्राग्मेटिक, नागपूर असतील. पॅनेलमध्ये डॉ. प्रवीण उईके (सहाय्यक संचालक आणि सहाय्यक केंद्रीय अप्रेंटिसशिप सल्लागार, बोट डब्ल्यूआर), प्रशांत अग्रवाल (सीईओ आणि संस्थापक, मायक्रोफ्लिटर), सोनाली मिश्रा (व्हीपी, मिटकॉन, नागपूर), डॉ. भूषण महाजन (टीपीओ, नागपूर विद्यापीठ), अभिजीत मंडवगणे (कोषाध्यक्ष, बीएमए, बुटीबोरी एमआयडीसी, नागपूर यांच्यासह प्रख्यात प्रशिक्षण एवं प्लेसमेंट अधिकारी तसेच उद्योगतज्ज्ञ सहभागी होऊन प्लेसमेंट धोरणे, अप्रेंटिसशिप संधी, कौशल्य गरजा आणि संयुक्त उपक्रमांवर चर्चा करतील.
शनिवार, ०६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता टीजीपीसीईटी एचआर कॉन्क्लेव्ह २०२५ चे आयोजन होईल. या कार्यक्रमाची थीम प्रगतीसाठी भागीदारीः उद्योग सहभागाद्वारे रोजगारक्षमता वाढवणे असून हा कॉन्क्लेव उद्द्योगातील एचआर तज्ञ, कॉर्पोरेट रणनीतिकार व टॅलेंट अक्विझिशन तज्ज्ञांना एकत्र आणणारा प्रभावी मंच ठरेल. या कार्यक्रमात सचिन मोहोड (व्यवस्थापकीय संचालक, अॅक्सेंचर, पुणे), सुधीर माटेटी (मुख्य मानव संसाधन अधिकारी, सिंटेल टेलिकॉम, पुणे), रामानुज चौबे (सहयोगी संचालक ग्लोबल एचआरबीपी आणि क्षमता विकास, टीसीटीएस, पुणे) हे रोजगारक्षमता वाढ, अभ्यासक्रम मजबूतीकरण आणि व्यावसायिक विकास मार्गावर चर्चा करतील. या परिषदेत संजुक्ता रॉय (स्पेसवुड), हिमांशू मिश्रा (व्हॅलेथी टेक्नॉलॉजीज), अर्पित रहमतकर (टीसीएस), मित्तल भट्ट (पागमेटिक ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड), सुरेश पंडितवार (शिल्पा स्टील्स अँड पॉवर लिमिटेड), संयुक्ता रॉय (स्पेसवुड ऑफिस सोल्यूशन्यस प्रायव्हेट लिमिटेड), आशिष कोल्हे (सोलर इंडस्ट्रीज लिमिटेड) आणि इतर प्रतिष्ठित पॅनलिस्ट देखील उपस्थित राहतील, जे सध्याच्या एचआर ट्रैड्स, उद्द्योग अपेक्षा आणि भविष्यातील कामगार तयारीबद्दल मौल्यवान अंतराष्ट्रीय सामायिक करतील.




























































































































































































































































































































































































































