देवेंद्र फडणवीस आज भरणार नामांकन अर्ज
मुंबई, दि. 24 ऑक्टोबर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, दि. 25 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. तत्पूर्वी सकाळी 10.15 वाजता ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील. त्यानंतर संविधान चौकात येऊन तेथून सकाळी 10.40 वाजता रॅलीला प्रारंभ होईल.
सकाळी 11 वाजता ते आपला उमेदवारी अर्ज नागपूर तहसिल कार्यालयात सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी दोन वेळा पश्चिम नागपूरमधून निवडून आले आहेत, तर त्यानंतर नव्याने तयार झालेल्या दक्षिण-पश्चिम नागपूरमधून तीन वेळा निवडून आले आहेत. सलग 5 वेळा निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांची ही सहावी विधानसभा निवडणूक आहे. 1999 पासून त्यांच्या आमदार म्हणून कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण झाले आहेत.




























































































































































































































































































































































































































