आकाश इन्विक्टस उच्चस्तरीय जेईई तयारीसाठी उपक्रम लॉन्च
नागपूर ( दि. २८ मार्च २०२५ ) आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड भारतातील अग्रेसर टेस्ट प्रिपरेटरी संस्था, अभियांत्रिकी क्षेत्रातील आयआयटी किंवा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांत प्रवेश तयारी करणाऱ्या सर्वोत्तम व प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी आकाश इन्विक्टस हा एआय-समर्थित, वैयक्तिकृत, उच्च-तीव्रतेचा व निकाल-केंद्रित नावीन्यपूर्ण उच्चस्तरीय जेईई तयारी उपक्रम लॉन्च करत आहे.
आकाश इन्विक्टस अंतर्गत आयआयटी मार्गदर्शनात सिद्धहस्त अनुभवी ५०० हून अधिक जेईई तज्ज्ञ शिक्षक एकत्र येणार आहेत. सर्वोच्च आयआयटी रँक मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम आधुनिक व नीटनेटका असून फिजिटल शिक्षण पद्धतीचा अवलंब करतो. एआय-सक्षम व अॅडप्टिव्ह लर्निंगद्वारे विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स्डच्या सर्वोत्तम तयारीसाठी विशेष अध्ययन संसाधने दिली जातील.




























































































































































































































































































































































































































