नागपूर
12-10-2025 17:46:39
Mission Maharashtra
महेश बंग व सहकाऱ्यांनी घेतली सुप्रियाताई सुळे भेट
नागपूर ( दि. १२ ऑक्टोंबर २०२५ ) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण सेंटरच्या केंद्रीय कार्याध्यक्ष, खासदार सुप्रियाताई सुळे नागपूर दौऱ्यावर आल्या असता यशवंतराव चव्हाण सेंटर नागपूर केंद्राचे अध्यक्ष महेश बंग व सहकाऱ्यांनी भेट घेतली.
नागपूर केंद्रा द्वारे घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती सुप्रियाताई सुळे यांना दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर जिल्हा परिषदेतील माजी गटनेते दिनेश बंग, माजी जि. प सदस्य सलील देशमुख, शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, राजाभाऊ टाकसांडे, वेदप्रकाश आर्या, रवींद्र देशमुख, फारुख अफजल, वर्षा शामकुळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.




























































































































































































































































































































































































































