विद्यार्थी मित्रांनो परिश्रमाने संकटांवर मात करा - रूपाली मोरे,
★ स्व. देवकीबाई बंग विद्यालय कान्होलीबारा येथे वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा
हिंगणा ( दि. ३१ जाने. २०२५ ) आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याचा सुजाण नागरिक घडविण्यात पालकांची जितकी महत्त्वाची भूमिका असते त्यापेक्षाही किंबहुना अधिक महत्त्वाची भूमिका ही शाळेची आणि शिक्षकांची असते. ती भूमिका शाळेनी व शिक्षकांनी जर योग्य रीतीने पार पाडली आणि विद्यार्थ्यांनी पुढे येणाऱ्या संकटांना मेहनतीने, चिकाटीने आणि परिश्रमाने तोंड दिल्यास त्या परिस्थितीवर मात करून यश प्राप्त करता येतो, अशा बालरंगभूमीच्या उपाध्यक्ष तथा चित्रपट निर्मात्या रूपाली मोरे यांनी स्व देवकीबाई बंग इंग्रजी माध्यमिक विद्यालय कान्होलीबारा येथे आयोजित वार्षिक क्रीडा दिन कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग होते तर उद्घाटक म्हणून बालरंगभूमीच्या उपाध्यक्ष, चित्रपट निर्मात्या रूपाली मोरे, प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेच्या उपाध्यक्ष अरुणा बंग, कोषाध्यक्ष महेश बंग, केंद्रप्रमुख एकनाथ ढोरे, अमृतराव बुधबावरे, वामनराव देवतळे, देवराव मसराम, हनुमान दुधबळे, अशोक आंबुलकर, प्रशांत गव्हाळे, सौ आदमने ताई, रोशन दुधबळे, विक्की कुंभारे, वि.जा.भ.ज आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम काटोले, अतुल कटरे,प्रामुख्याने उपस्थित होते.
क्रीडा दिनाच्या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिल दे दिया, पिरॅमिड, बुम बुम, गोवा मिक्स, रिंग डान्स, जयंतु जयंतु भारत , स्वीट विथ फ्रिल, वंदे मातरम, झुंबा, अरेबिक झुंबा, डंबल डान्स, जय हो आदी क्रीडा प्रकारातील नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक संदीप कैलुके यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती घांगरेकर यांनी तर आभार पुरुषोत्तम काटोले यांनी मानले. कार्यक्रमाला पालकांचा भरघोस प्रतिसाद होता.
यशस्वीते करिता अश्लेषा मानकर, किरण बुधबावरे, आचल सोमनकर, नूतन काटवे, अंजली येलुरे, बाबा चंदनखेडे, पायल धोंगडे ,जयश्री भांडेकर, अनुष्का चीखलखुंदे, विजया बुंडे यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले




























































































































































































































































































































































































































