डब्लूसीएल आयटीआय अप्रेंटिस प्रशिक्षणार्थींचा संविधान चौकात धरणे आंदोलन
नागपूर: ( दि. १२ ऑगस्ट २०२६ ) डब्लूसीएल च्या सर्व विभागांतून ट्रेड अप्रेंटिस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींच्या रोजगाराच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले. भारतीय अप्रेंटिस संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार निर्मलकर तसेच एसीसीएल प्रशिक्षणार्थी दिनेश राऊत आणि गोपाल हंबर्डे यांच्या नेतृत्वात हजारो प्रशिक्षणार्थी या आंदोलनात एकवटले होते.
डब्लूसीएल प्रशासनाने गेल्या ४ ते ५ वर्षांपासून चुकीची धोरणे राबवून प्रशिक्षणार्थींवर अन्याय केला आहे. १२ महिने कोणतेही अधिकृत ट्रेड प्रशिक्षण न देता, प्रत्यक्ष मजुरांसारखे कसून काम करून घेऊन गैरवापर केल्याचा घणाघाती आरोप आंदोलकांनी केला.
कोल इंडियाचीच उपकंपनी SECL (छत्तीसगड) मध्ये स्थानिक प्रशिक्षणार्थींच्या आंदोलनानंतर कराराद्वारे आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर WCL मधील सर्व प्रशिक्षित युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार स्थानिक पातळीवर तातडीने रोजगार उपलब्ध करून द्यावा, या मागणीचे निवेदन
WCL चे मुख्यालय (सिव्हिल लाइन्स) महाप्रबंधक व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागपूर जिल्हाधिकारी व त्यांच्या मार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, संबंधित केंद्रीय व राज्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना पत्रव्यवहार करून या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या आंदोलनात भारतीय अप्रेंटिस संघाचे पदाधिकारी व प्रमुख नेते - गणेश ताजने, विपुल काशिवार, सौरभ निनावेकर, प्रमोद तुरकर, श्रेयस माकडे, रूशान अली, अमन कावळे, वैष्णवी देठे, पायल कामडी, निखिल सोनटक्के, रोशन सोनटक्के, कुणाल वऱ्हाटे, सूर्यकांत वांढरे, निशांत पेंदाम, कुणाल कोरांगे, अक्षय बोढने, अंकुश कोवे यांच्यासह डब्लूसीएलच्या विविध भागांतून आलेले हजारो तरुण-तरुणी सहभागी झाले होते.

































































































































































































































































































































































































































































































