नागपूर
04-02-2026 20:13:48
Mission Maharashtra
बजेट सामान्य माणसाच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे : मंगेश वानखेडे
नागपूर ( दि. ४ फेब्रु २०२६ ) हे बजेट म्हणजे सामान्य माणसाच्या अपेक्षांवर पाणी फेरणारे बजेट आहे. महागाई बेरोजगारी आणि शेतकरी प्रश्नावर ठोस सरकारने फक्त आकड्यांची जुगलबंदी दाखवली आहे. युवकांच्या भविष्याबाबत सरकारकडे कोणतेही स्पष्ट रोडमॅप नाही. रोजगाराच्या प्रश्नावर उत्तर देण्याऐवजी तरुणांची वारंवार दिशाभूल केली जात आहे.
हे बजेट जनतेसाठी नसून केवळ प्रचारासाठी मांडलेले आहे, सदर झालेला अर्थसंकल्प हे केवळ घोषणांचा गाजावाजा ठरला आहे. प्रत्यक्षात सामान्य नागरिक तरुण, शेतकरी आणि वंचित घटकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस आर्थिक तरतूद किवा स्पष्ट धोरण दिसत नाहीं. शेक्षणिक क्षेत्रात ग्ंतवणुकीऐवजी खर्चकपातीचा कल जाणवत. रोजगाराच्या बाबतीतही चित्र निराशाजनक आहे अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडी नागपूर शहर अध्यक्ष मंगेश वानखेडे यांनी दिली.




























































































































































































































































































































































































































