महात्मा फुले शिक्षण संस्थेत शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
नागपूर: ( दि. 19 फेब्रु. 2026 ) महात्मा फुले शिक्षण संस्था रेशीमबाग येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पवार यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा. मुकेश घोळसे व संचालिका शोभा लेकूरवाळे यांनी माल्यार्पण करून उपस्थितांनकडून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवीद्र अंबाडकर सह चिटणीस रमेश राऊत, थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी समारोह समिती चे संयोजक राजेंद्र पाटील, सह संयोजक डॉ. प्रा. अभिजित पोतले, संचालिका माधुरी गणोरकर तसेच प्रा. प्रदीप दहिकर, शंकरराव चौधरी, घनश्याम खवले, गोविंदराव ठाकरे, उज्वला पाटील, सिंधू कांडलकर व कर्मचारी वृंद उपस्थित होता.




























































































































































































































































































































































































































