मध्यमवयीन आणि तरुण रुग्णांमध्ये हृदयरोगाचा वाढता धोका, उपचारासाठी उशिरा पोहोचल्याने रुग्णाची वाचण्याची शक्यता कमी
◆ विदर्भाचे हृदय धोक्यात वोक्हार्ट हॉस्पिटलच्या सव्र्व्हेतून धक्कादायक निष्कर्ष
नागपूर, (२५ सप्टेंबर २०२५ ) जबाबदार कॉर्परिट म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी तारापूर व आसपासच्या भागालील डॉक्टरांमध्ये एक महिन्याचे हार्ट हेल्थ इन्साईट्स सव्र्व्हेक्षण केले. यात कार्डिओलॉजिस्ट, जनरल प्रेक्टिशनर्स आणि रेसिडेंट मेडिकल ऑफिसर्स (आरएमओ) सहभागी झाले. या सव्र्व्हेमुळे मध्य भारतातील हृदयविकाराशी संबंधित आव्हानांचे संपूर्ण चित्र समोर आले.
या सव्र्व्हेक्षणातील निष्कर्ष चिंताजनक आहेत हृदयरोग आता फक्त वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही. बहुतांश डॉक्टरांच्या मते ४१ ते ६० वयोगटातील रुग्णांची संख्या जास्त आहे, तर अनेकांनी ३० वर्षांच्या आसपासच्या तरुणांमध्येही हृदयरोगाचे प्रकरणे वाढल्याचे नमूद केले. दहा वर्षांपूर्वी नागपूरमध्ये ३० वर्षांच्या रुग्णांना हृत्यरोग होताना पाहणे दुर्मिळ होते. पण आज तणावपूर्ण नोकऱ्या, चुकीची जीवनशैली आणि वेळेवर तपासणी न केल्यामुळे तरुण हृदयविकाराच्या झटक्याने हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. हा एक मोठा इशारा आहे." असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सिनियर काडिओलॉजिस्ट डॉ. नितीन तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सव्र्व्हेक्षणात दिसून आले की हृदयाची प्रतिबंधात्मक तपासणी अजूनही होत नाही, अनेक हॉक्टरांनी सांगितले की रुग्ण फक्त लक्षणे दिसल्यानंतरच हॉस्पिटलमध्ये बेलाल, तर प्रतिबंधात्मक तपासणीसाठी येणे अगदी कमी आहे. "आजच्या स्पर्धात्मक वातावरणाल, कामाच्या ठिकाणी असो वा घराल तरुणांवर प्रचंड ताण असतो ज्यामुळे झोपेची गुणवत्ता कमी होते आणि यामुळे ह्दयविकाराचा धोका वाढलो," असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सिनियर सीव्हीटीएस सर्जन डॉ. सुमित नारंग यांनी सांगितले. "शहरीकरण, बसून काम करण्याची सवय, पोटाभोवती वाढलेली चरबी, आहारातील बदल, वाढते प्रदूषण, ताण, अपुरी झोप, लवकर सुरू होणारा मधुमेह आणि आनुवंशिक कारणे हे सर्व घटक भारतीय रुग्णांमध्ये कमी वयात हृदयरोग होण्यास कारणीभूत ठरल आहेत," असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. दिनेश पडोळे यांनी सांगितले. रुग्णांना प्रतिबंधात्मक तपासणीची सवय अजूनही नाही. रुग्ण हॉस्पिटलमध्ये पोहोचेलोवर उपचाराचा सुवर्णकाळ निघून जातो. जागरूकता आणि वेळेवर तपासणी हीच खरी गरज आहे. वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमित बल्लमवार यांनी सांगितले. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे जागरूकतेचा अभाव. दोन-तृतीयांशाहून अधिक डॉक्टरांनी सांगितले की रुग्णांना स्वतःचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि साखरेची पातळी याची पूर्ण माहिती नसते. अध्याहून अधिक डॉक्टरांनी असेही पाहिले की रुग्ण हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे जसे की, रामलील दुखणे, घाम येणे किंवा स्वास घेणे अवघड होणे ओळखू शकत नाहीत,
हे सव्हेक्षण नागपूरमधील प्रत्यक्ष परिस्थिती दाखवतो. जागरुकता, वेग आणि उपचारांची उपलब्धत हे तीन महत्वाचे घटक आहेत. वोक्हार्टमध्ये आम्ही डॉक्टर, समाज आणि माध्यमांच्या मदतीने हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि विदर्भातील रुग्णाचे आरोग्य सुधारणे ही आमची जबाबदारी मानतो,' असे वोक्हार्ट हॉस्पिटल्स, नागपूरचे सेंटर हेड रवी बागली यांनी सांगितले. संपूर्ण सव्र्व्हेक्षणाल पश्चिम भारतातील मुंबई शहर, एमएमआर, राजकोट आणि नागपूर यांचा समा होता आणि येथील सुमारे ३२६ डॉक्टरांनी सहभाग घेतला. यापैकी ४८ डॉक्टर नागपूरचे होते आणि रिपोर्ट त्यांच्या मलांवर आधारित आहे.




























































































































































































































































































































































































































